दिवाळी विशेष – खुसखुशीत खव्याची करंजी रेसिपी | khavyachi karanji recipe | gujiya recipe

दिवाळी मधील एक लोकप्रिय पदार्थ म्हणजे करंजी. उत्तर प्रदेश, राजस्थान आणि मध्य प्रदेशात हा पदार्थ ‘गुजिया'(Karanji) या नावाने प्रसिद्ध आहे. मैदा किंवा गव्हाच्या पिठापासून करंजी तयार केली जाते. चला तर जाणून घेऊया करंजी रेसिपी ( karanji recipe ).

करंजी रेसिपी / karanji recipe :

दिवाळी विशेष - खुसखुशीत खव्याची करंजी रेसिपी | khavyachi karanji recipe | gujiya recipe

साहित्य :

मैदा – १ कप , तूप – १ कप, कोमट पाणी – १/४ ग्लास , पिठी साखर – १ कप, भाजलेला खवा – १ कप, बारीक किसलेले सुके खोबरे – १ कप , पिस्ता आणि बदामाचे काप, रवा – १/२ कप, चारोळी – एक चमचा, १/४ चमचा वेलची पावडर.

कृती :

पॅनमध्ये एक चमचा तूप गरम करायला ठेवा.

तूप गरम झाल्यानंतर त्यात अर्धा कप रवा लालसर होईपर्यंत चांगला भाजून घ्यावा.

यानंतर एक कप बारीक किसलेले सुके खोबरे, चारोळी, सुक्या मेव्याचे काप, वेलची पूड मिक्स करावे.

दुसऱ्या एका भांड्यात एक कप मैदा घ्या, त्यात अर्धा कप तूप मिक्स करून घ्यावे. तूप आणि मैदा नीट मिक्स करून घ्यावा.

त्यानंतर त्या पिठामध्ये थोडं-थोडं कोमट पाणी घालून करंजीसाठीचे पीठ मळून घ्यावे. पीठ मळून झाल्यानंतर ते स्वच्छ कापडाने थोड्या वेळासाठी झाकून ठेवा.

पॅनमधील मिश्रण थंड झाल्यावर त्यात एक कप पिठी साखर, एक कप भाजलेला मावा मिक्स करून घ्यावा. अशा प्रकारे करंजीचे सारण तयार झाले आहे.

मळलेल्या पिठाचे छोटे गोळे घेऊन छोटी पुरी लाटून त्यामध्ये तयार केलेले माव्याचे सारण घालून करंजी तयार करावी.
तुपात किंवा तेलात करंज्या तळून घ्याव्यात.

करंज्या थंड झाल्यावर एका हवा बंद डब्यामध्ये भरून ठेवाव्यात.

👶 ChulbulBunny – For Healthy Tummies & Happy Babies! 👶

🌟 Join the ChulbulBunny Community Today! 🌟

We are family of 68k on Social Media & growing.

पालकत्वाच्या अधिक टिप्स, बेबी केअर आणि डाएट, मदर केअर, घरगुती उपचार आणि टिप्ससाठी आम्हाला Instagram आणि YouTube वर फॉलो करा:

📷 Instagram: @ChulbulBunny

📺 YouTube: @ChulbulBunny

🛒 Shop Now at https://chulbulbunny.com/ and give your baby the gift of pure organic nutrition. Remember, every bite counts! 🍼

Leave a Reply

Shopping cart

0
image/svg+xml

No products in the cart.

Continue Shopping